Homeशैक्षणिक - उद्योग भारतात येत आहे किम कार्दशियनचा ‘स्किम्स’ ब्रँड

भारतात येत आहे किम कार्दशियनचा ‘स्किम्स’ ब्रँड

• दिल्ली-मुंबईत उघडणार पहिले स्टोअर्स
कोल्हापूर :
किम कार्दशियनचा जागतिक स्तरावर लोकप्रिय फॅशन ब्रँड ‘स्किम्स’ आता भारतात प्रवेश करत आहे. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडने स्किम्ससोबत विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत भारतातील पहिले स्किम्स स्टोअर्स दिल्ली आणि मुंबई येथे सुरू करण्यात येणार असून, देशातील ब्रँडची रिटेल स्टोअर्स तसेच डिजिटल व्यवसायाची जबाबदारी रिलायन्स ब्रँड्सकडे असेल.
किम कार्दशियन आणि जेन्स ग्रेड यांनी २०१९ मध्ये ‘स्किम्स’ची स्थापना केली. महिलांसाठीचे अंतर्वस्त्र, शेपवेअर आणि आरामदायी परिधान यांसाठी हा ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या की, शेप, आरामदायीपणा आणि सर्वसमावेशकता याबाबतची जगाची विचारसरणी बदलण्यात स्किम्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय ग्राहकांची नवी पिढी स्वतःच्या आकांक्षांशी सुसंगत आणि त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या फॅशनची अपेक्षा ठेवते. अशा ग्राहकांसाठी स्किम्स भारतात आणताना आम्हाला अभिमान वाटतो.
स्किम्सच्या सह-संस्थापक आणि मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी किम कार्दशियन म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या कपड्यांमध्ये आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटावे, या विचारातून स्किम्सची निर्मिती झाली आहे. भारतीय ग्राहकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही अत्यंत आनंदित आहोत.
भारतातील स्किम्सचा विस्तार टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. दिल्ली आणि मुंबईत सुरुवात केल्यानंतर ब्रँडची स्टोअर्स आणि डिजिटल उपस्थिती देशातील इतर शहरांमध्येही वाढविण्यात येईल.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29 ° C
29 °
29 °
79 %
2.6kmh
11 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page