कोल्हापूर :
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अकीवाट येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन करत दत्त कारखान्याच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेती केल्यास प्रतिएकर १०० ते १५० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेणे शक्य असल्याचे सांगितले.
या मेळाव्यात बोलताना जगताप यांनी ऊस लागवडीपासून काढणीपर्यंतचे संपूर्ण वैज्ञानिक नियोजन शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत उलगडून सांगितले. योग्य अंतरावर सरी काढणे, हुमणी किडीचे प्रभावी नियंत्रण, जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन, एक डोळा व दोन डोळा लागवड पद्धतीचे फायदे, पाणी व्यवस्थापन, औषध फवारणीचे योग्य वेळापत्रक, पिकाच्या वाढीनुसार पानांचा रंग व जाडी यावरून पिकाची स्थिती ओळखणे, फुटवा झाल्यानंतर बाळभरणीचे नियोजन तसेच कीटकनाशकांचा योग्य वापर व पिकाची निगा याबाबत सविस्तर माहिती दिली.
यासोबतच ऊस लागवडीसाठी दर्जेदार बियाण्याची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, निरोगी व रोगमुक्त बेणे वापरण्याचे महत्त्व आणि उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
महावीर शिरगावे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य शेती अधिकारी हेगान्ना यांनी आधुनिक ऊस शेतीतील विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. महाधन कंपनीचे योगेश महसे यांनी ऊस पिकासाठी आवश्यक असलेल्या खत व्यवस्थापनाचे नियोजन आणि संतुलित खतांच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पंचसूत्री शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन करत सुपर केन नर्सरीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. दत्त कारखाना हा नेहमीच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब बडबडे होते. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक इंद्रजित पाटील, प्रमोद पाटील, संजय पाटील, ज्योतीकुमार पाटील, भैयासाहेब पाटील, बाळासाहेब हलसवडे, महेंद्र बागे, सिदगोंडा पाटील, विजय सूर्यवंशी, रावसाहेब नाईक, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. देसाई, सज्जनसिंग राजपूत, मोहन ढवळे, ताजुद्दीन तहसीलदार, राजगोंडा पाटील (शिरगावे), भरत रायनाडे, भरमू रायनाडे, लालू आवटी, बाबासो नाईक, कुमार मिठारी, राजू आवटी, कुमार तवंदकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
दत्त कारखान्याच्या मार्गदर्शनानुसार शेती केल्यास १०० ते १५० टन ऊस उत्पादन शक्य : जयवंत जगताप
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3
°
C
28.3
°
28.3
°
85 %
10.5kmh
100 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
29
°

