Homeकला - क्रीडाखुशी कांबोजची अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’च्या ‘विल्डरनेस प्रोग्राम’ संचालकपदी निवड

खुशी कांबोजची अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’च्या ‘विल्डरनेस प्रोग्राम’ संचालकपदी निवड

कोल्हापूर :
साहसी क्रीडा आणि गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खुशी कांबोज हिची अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘कॅम्प ऑगस्टा’च्या ‘विल्डरनेस प्रोग्राम’च्या डायरेक्टर (संचालक) पदावर निवड झाली आहे. अमेरिकेत काम सुरू केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच वर्षी तिला ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कॅलिफोर्निया राज्यातील नेवाडा सिटीजवळ सिएरा नेवाडा पर्वतरांगांमधील निसर्गरम्य ९० एकर परिसरात वसलेला कॅम्प ऑगस्टा हा जगातील आगळावेगळा समर कॅम्प म्हणून ओळखला जातो. १९३१ साली एडविन विल्यम एहमान आणि शार्लेट एहमान यांनी या कॅम्पची स्थापना केली. सुरुवातीला तो केवळ मुलींसाठी निवासी कॅम्प होता. पुढे काळानुरूप त्यात बदल होत गेले आणि आज हा कॅम्प साहस, नेतृत्व, सर्जनशीलता, निसर्गप्रेम आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
खुशी २०२५ पासून कॅम्प ऑगस्टामध्ये कौन्सिलर म्हणून कार्यरत आहे. मुलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, नवीन कौशल्ये शिकवणे, भीतीवर मात करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि निसर्गाशी त्यांचे नाते दृढ करणे या जबाबदाऱ्या तिने अत्यंत प्रभावीपणे पार पाडल्या. तिची कामाप्रती असलेली निष्ठा, मुलांना शिकवण्याची वेगळी शैली आणि नेतृत्वगुण यांची दखल घेत तिला आता ‘विल्डरनेस प्रोग्राम’च्या संचालकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
कोविडनंतर बंद पडलेला ‘विल्डरनेस प्रोग्राम’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कॅम्प प्रशासनाने घेतला आहे. या विभागाच्या पुनर्बांधणीची संपूर्ण जबाबदारी खुशीवर सोपविण्यात आली आहे. गिर्यारोहणातील तिचा प्रदीर्घ अनुभव, तांत्रिक प्रशिक्षण आणि साहसी उपक्रमांचे नियोजन करण्याची क्षमता लक्षात घेऊन तिची या पदासाठी निवड करण्यात आली.
या जबाबदारीअंतर्गत विविध साहसी उपक्रमांचे नियोजन, प्रशिक्षण पद्धती विकसित करणे, प्रशिक्षकांची निवड व प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, आवश्यक साहित्याची उपलब्धता, बजेट नियोजन, खानपान व्यवस्था तसेच कार्यक्रमाचे प्रभावी प्रमोशन अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचे नेतृत्व खुशी कांबोज करणार आहे.
             ————-
ही अत्यंत अभिमानाची बाब…
साहसी क्रीडा क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेत इतक्या कमी कालावधीत संचालकपदाची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
खुशीच्या या यशाबद्दल तिच्या पालकांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, तिच्या चिकाटी, मेहनत आणि साहसी क्रीडाप्रती असलेल्या समर्पणामुळेच तिने हे यश संपादन केले आहे. तसेच तिच्या या यशामध्ये गिर्यारोहण क्षेत्रातील मार्गदर्शक मेहबूब मुजावर आणि गणेश गीध यांचेही मोलाचे योगदान असल्याची भावना सौ. संगीता कांबोज व विनोद कांबोज यांनी व्यक्त केली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page