Homeकला - क्रीडापन्हाळा ते पावनखिंड पदमोहीम उत्साहात

पन्हाळा ते पावनखिंड पदमोहीम उत्साहात

शिवगर्जना व सप्तगिरी संस्थेचा उपक्रम
कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगड ते पावनखिंड मार्गावर शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर आणि सप्तगिरी सामाजिक विकास संस्था  कौलगे (ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदमोहीम उत्साहात पार पडली.
तरुण पिढीमध्ये शिवकालीन इतिहासाविषयी जागृती निर्माण व्हावी, गड-किल्ल्यांचे जतन-संवर्धन व्हावे आणि प्राचीन मर्दानी खेळांचे महत्त्व कळावे, या मुख्य उद्देशाने या पदमोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
पन्हाळगडावरील ऐतिहासिक राजदिंडी येथून छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शिववंदनेने मोहिमेला प्रारंभ झाला. पन्हाळगड, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी आणि आंबार्डे मार्गे मोहीम पावनखिंडीच्या दिशेने रवाना झाले. मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी शिवगर्जना प्राचीन युद्धकला संस्थेच्या शिलेदारांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक आणि कट्यार यांसारख्या पारंपरिक मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. रणमर्द मावळ्यांनी पांढरेपाणी ते पावनखिंड ईटाफेक (विटा) नावाचे शस्त्र खेळत अंतर पार पाडले व मावळ्यांच्या स्मृतीना उजाळा दिला. या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची व ग्रामस्थांची मन जिंकली. तसेच सप्तगिरी सामाजिक विकास संस्थेच्यावतीने मोहिमेदरम्यान पर्यावरण रक्षण आणि गड-किल्ले स्वच्छतेचा संदेश दिला.
पारंपरिक मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलेलै मावळ्यांचा सत्कार  के. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पावनखिंडीत पोहोचल्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि तीनशे बांदल मावळ्यांच्या पावन स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी इतिहास अभ्यासकांनी पावनखिंडीतील असीम त्यागाचा आणि रणसंग्रामाचा इतिहास मांडला.
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष नाना सावंत, अतुल निंबाळकर, श्रध्दा जोशी, मल्हार सावंत, अर्जुन वाडेकर, प्रल्हाद सागर, प्रमोद सागर, विनायक गवळी, सागर कदम, पाडुरंग जाधव, सागर लोहार, राहुल भोसले, शुभम सनगर, युवराज टाक, श्रीनिधी कोगनोळे, श्रर्वरी कोगनोळे व सप्तगिरी सामाजिक विकास संस्था कौलगे यांचे पदाधिकारी, प्रशिक्षक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
79 %
7.9kmh
15 %
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page