Homeकला - क्रीडाराज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या खेळाडूंचे यश

राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या खेळाडूंचे यश

कोल्हापूर :
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ईश्वरपूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, ईश्वरपूर संचलित श्री. आण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा २०२६ शिक्षणमहर्षी श्री आण्णासाहेब डांगे यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त उत्साहात पार पडल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या कुस्ती व मल्लखांब केंद्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले.
वैयक्तिक गटात १८ वर्षांखालील मुलांच्या गटात मयूर गावडे याने रौप्यपदक पटकाविले. सांघिक गटात १८ वर्षांखालील मुलांच्या गटात आज्ञेश मुडशिगिकर, अथर्व कोळी, विज्ञान तमायचे, पृथ्वीराज अरागे, हर्षवर्धन गावडे, मयूर गावडे यांनी तसेच १६ वर्षांखालील मुलींच्या गटात अनुपमा पाटील, मुक्ता धनगर, कावेशी कुंभार, अमृता पाटील, निशिगंधा आंबी, भूमिका पाटील यांनी यश मिळविले.
यावेळी याशिवाय, इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या पै. अभिजीत विरेंद्र यादव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या सर्व खेळाडूंचा व इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या पै. अभिजीत विरेंद्र यादव यांचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा सहकारमहर्षी गणपतराव पाटील (दादा) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, सुभाष धूमे, प्रशिक्षक संजय देबाजे, चंद्रशेखर कलगी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page