कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त
कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. सी. बी पाटील म्हणाले की, बहुजन समाजात शिक्षणाचे नव नवे प्रयोग राजर्षी शाहू महाराजांनी केले. विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सोय केली. शेती व उद्योगांसाठी दुरदृष्टी ठेवून राधानगरी धरण, शाहू मिल उभी केली. शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. समतेचे, न्यायाचे आणि लोककल्याणाचे राज्य स्थापन करण्याचे आणि निर्बलांचे रक्षण करण्याचे महान कार्य शाहूंनी केले.
याप्रसंगी डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या की, राजर्षी शाहूंचे विचार जतन करण्याबरोबरच त्यांची दररोजच्या व्यवहारात अंमलबजावणी करणे आजच्या काळाची गरज आहे. विशेषत: शिक्षणक्षेत्रातील लोकांनी राजर्षी शाहूंच्या दृष्टीकोनातून विचार करुन शिक्षणात उत्क्रांती घडवून आणण्याची आणि राष्ट्र बांधणीसाठी तरुणांना तयार करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समीक्षा फराकटे यानी केले. आभार ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी मानले. यावेळी डॉ. कविता तिवडे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. विकास जाधव, प्रा. मयुरी गावडे, डॉ. व्ही. बी. वाघमारे, डॉ. नम्रता नरेवाडीकर, प्रा. एम. आर. नवले, प्रा. जे. आर. भरमगोंडा, प्रा. सौ. एस. पी. पंचभाई, प्रबंधक सचिन धनवडे, सदानंद दुर्गुळे, वसंत पाटील, प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी छात्र, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
——————————
विवेकानंद कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
Mumbai
broken clouds
29.4
°
C
29.4
°
29.4
°
72 %
4.5kmh
62 %
Fri
29
°
Sat
30
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
29
°

