कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर तसेच कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि जनकल्याणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे महान कार्य केले. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरतात. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाचा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या याच लोककल्याणकारी विचारांतून प्रेरणा घेत गोकुळ दूध संघ ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.
याप्रसंगी गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. दयावर्धन कामत, दत्तात्रय वागरे, डॉ. प्रकाश दळवी, बाजीराव राणे, रमेश पाटील, कैलास मोळक, शिवाजी पाटील, डॉ. भरत साठम, डॉ. रवि नाईक, डॉ. शिवलिंग बोबडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
गोकुळतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
Mumbai
light rain
30
°
C
30
°
29.9
°
74 %
5.1kmh
83 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

