कोल्हापूर :
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशाने आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक रंगराव चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवड केली आहे.
या महत्त्वाच्या पदावर दीपक चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील निराधार, वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींना योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून याअंतर्गत गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि सामाजिक संरक्षण मिळते.
दीपक चव्हाण हे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, उप शहर प्रमुख पदावर काम केले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सक्रिय सहभागाने ही नियुक्ती करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी दीपक चव्हाण
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
26 %
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

