Homeकला - क्रीडा९ वर्षांच्या "देवांश"च्या स्वरांनी जिंकली रसिकहृदये

९ वर्षांच्या “देवांश”च्या स्वरांनी जिंकली रसिकहृदये

कोल्हापूर :
काही स्वर असे असतात जे थेट काळजाला भिडतात. असाच काहीसा अनुभव कोल्हापूरच्या रसिकांनी नुकताच घेतला. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था आणि जाणीव फाउंडेशन च्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘कृतज्ञतांजली’ या उपक्रमाचा पहिला कार्यक्रम ‘जिंदगी कैसी है पहेली’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या मैफलीचे खरे मानकरी ठरले ते म्हणजे ९ वर्षांचे बालगायक देवांश भाटे.
इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या देवांशने मन्ना डे यांची ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘पूछो न कैसे मैने’ ‘केतकी गुलाब जुही’ यांसारखी शास्त्रीय बैठक असलेली, तसेच ‘जिंदगी कैसी है पहेली’ सारखी तत्त्वचिंतन मांडणारी गाणी, तसेच, यारी है इमान मेरा ही अत्यंत अवघड कव्वाली ज्या आत्मविश्वासाने सादर केली, त्याने उपस्थित रसिक थक्क झाले. त्याच्या निरागस स्वरांनी मन्ना डे यांच्या आठवणींना एक नवी झळाळी दिली.
कार्यक्रमाचे उदघाटन घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेडचे किरण पाटील, उद्योजक अभय देशपांडे, आर्थिक सल्लागार अमरसिंह राजपूत, बांधकाम व्यावसायिक मिलिंद नाईक, मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, वास्तुविशारद शिरीष बेरी आणि आयकर आयुक्त मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.
या मैफलीत देवांशला मंदार भाटे आणि वसुधा लिंगस यांनी गायनाची जोड दिली. प्रा. सतीश कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून मन्ना डे यांच्या सांगीतिक प्रवासाचे पैलू उलगडले. वाद्यवृंदात विक्रम पाटील, मनोज जोशी, अनिकेत ससाणे आणि गणेश साळोखे यांनी सुरेल साथ दिली.
गरजूंना मदत करण्याच्या भावनेतून आणि महान कलावंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमाचे संयोजन प्रशांत जोशी यांनी केले. यावेळी उद्योगपती मोहन घाटगे, ज्येष्ठ गायिका शितल धर्माधिकारी, डॉ. सुश्रुत हर्डीकर, डॉ. सुरेश देशपांडे, मिलिंद गुणे, दिलीप गुणे, गोविंद पैठणे आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
5.1kmh
77 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page