Homeराजकियमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या महापालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या महापालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

• केशवराव भोसले नाट्यगृह व प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर होणार कार्यक्रम
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी (दि.९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह तसेच प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आम. राजेश क्षीरसागर, महापौर सौ. रूपाराणी निकम, खा. धनंजय महाडीक, खा. शाहू छत्रपती महाराज, आम. सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, अमल महाडीक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, पोलिस अधीक्षक निलोत्पल तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे (रु. २५.१० कोटी), मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील ॲस्ट्रोटर्फयुक्त मैदान व सुविधा (रु. ६.९६ कोटी), दुधाळी येथील ६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (रु. १२ कोटी), श्रीक्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) तीर्थक्षेत्र आराखड्यातील बहुमजली पार्किंग इमारतीचे (रु. ३९.८० कोटी), गोकुळ हॉटेलजवळील मेकॅनिकल पार्किंगचे (रु. ४.५० कोटी), नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या उर्वरित विकासकामांचे (रु. ९.४० कोटी) तसेच रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंज्याचे (रु. ५ कोटी) लोकार्पण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत सुमारे रु. ४८४ कोटी खर्चाच्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून, या प्रकल्पामुळे कोल्हापूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
80 %
8kmh
100 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page