Homeशैक्षणिक - उद्योग महापालिका शाळांमधील ७५५ विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास पास

महापालिका शाळांमधील ७५५ विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास पास

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १ ली ते १० वीच्या ७५५ विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोफत बस प्रवास पास देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या पासचे वितरण शुक्रवारी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आले. या उपक्रमामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान यांच्यावतीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना १५० स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे सकाळी आयोजित कार्यक्रमात उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.शिला सोनुले, पाणीपुरवठा समिती सभापती सौ. संगीता सावंत, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, प्रभाग समिती सभापती सौ. अनुराधा खेडकर, गटनेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसेवक ऋतुराज क्षिरसागर, अभिजित खतकर, अश्किन आजरेकर, वैभव माने, अजय इंगवले, स्वरूप कदम, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका सौ. निलीमा पाटील, सौ. प्राजक्ता जाधव, सौ. वंदना मोहिते, सौ. अरुणा गवळी, सौ. धनश्री कोरवी, सौ. अनुराधा मुळीक, सौ. जयश्री कांबळे, सौ. अर्चना पागर, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, अजित ठाणेकर, संजय सावंत, आनंदराव खेडकर, तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
92 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page