Homeइतरसिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल : खासदार सुधाकर सिंग

सिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल : खासदार सुधाकर सिंग

कोल्हापूर :
परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे कार्य पाहता भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल असा मला विश्वास आहे, असे मत बक्सर, बिहारचे खासदार सुधाकर सिंग यांनी सिद्धगिरी जननी हॉस्पिटलमध्ये आयोजित ‘मातृत्व दिन’ सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सिद्धगिरी जननीच्या प्रमुख संचालिका डॉ. वर्षा पाटील, केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग, व्यवस्थापक विवेक सिद्ध आदी प्रमुख उपस्थित होते.
खा. सुधाकर सिंग पुढे म्हणाले की, जागतिक व्यवस्थेचा अभ्यास केला असता भारत जरी लोकसंख्येत मोठा मोठा दिसत असला तरी नवीन प्रजनन होणारी पिढी व जुनी वार्ध्यक्याकडे झुकलेली पिढी यांच्या संख्येत अंतर वाढत आहे. डॉ. वर्षा पाटील यांनी लिहिलेले लेख व प्रबंध मी अभ्यासला आहे. त्यात त्यांनी भारतात ढासळणारी प्रजजन क्षमता याबद्दल सखोल विश्लेषण केले आहे. येणाऱ्या काळात वंध्यत्व हि एक भीषण समस्या होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर वंध्यत्व निवारणात होलिस्टिक प्रणालीने उपचार देणारे सिद्धगिरी जननी एक अभिनव सेंटर म्हणून काम करत आहे. देशाला दिशा देणारे विधायक काम निश्चितच सिद्धगिरी जननी विभाग करेल.
यावेळी डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या की, मातृत्व हि निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान आहे. सृजनशील पिढी निर्माण करण्यात स्त्रीशक्तीचे महत्वपूर्ण योगदान आहे. आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली, आहार-विहार, अनुवंशिक समस्या अशा कारणांनी ३१% लोकांच्यात वंध्यत्व आढळत आहे आणि हे  प्रमाण वाढत आहे. वंध्यत्व हि केवळ महिलांची समस्या नाही तर महिला व पुरुष दोघांची तपासणी होणे आवश्यक आहे.  वंध्यत्व समस्या निवारणासाठी केवळ आय.व्ही.एफ. सेंटर पर्याय नाही तर जागरूकता सर्वात आवश्यक आहे. योग्यवेळी योग्य उपचार मिळाले तर भविष्यातील खर्चिक उपचार टाळता येतात. यासाठी जागरूकता व योग्य सल्ला उपचार घेणे गरजेचे आहे.
बिहारचे केंद्रीय संयोजक बसंतकुमार सिंग म्हणाले की, मातृशक्तीला या देशातील संस्कृतीने उच्च असे स्थान दिले आहे. हि समस्या इतकी भीषण रूप धारण करून आपल्या समोर येणार आहे कि भविष्यात वृद्ध लोकांची सेवा करायला हि घरात कोणी असणार नाही. त्यामुळे आत्ताच जागृत होऊन वंध्यत्व निवारणासाठी उभे राहिले पाहिजे, हि काळाची गरज आहे.
विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की व्यापता न येणारे अस्तित्व आणि मोजता न येणारे म्हणजे मातृत्व आहे. या सुखापासून कोणी वंचित राहू नये या संकल्पनेतून पुज्यश्री स्वामीजींच्या प्रेरणेने व डॉ. वर्षा पाटील यांच्या निस्पृह सेवा भावनेने सिद्धगिरी जननी काम करत आहे. वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या कुटुंबात एक सुखाचा दिवा लावण्याचे काम सिद्धगिरी जननी करत आहे.
कार्यक्रमाचे आभार पुनीत मुचंडी यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आगामी वाटचालीची माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी डॉ. भूषण सुतार, डॉ. सुषमा नाडीकर, डॉ. विशाल खलाटे, डॉ. सुशांत गुणे, डॉ. प्रशांत नाडीकर, डॉ. चिराग गांधी, डॉ. प्रियांका तेले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. उज्वला माळी, डॉ. आरती माने. अनुराधा शिंदे, संजय पाटील, दिगंबर पाटील किसन साळुंखे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34 ° C
34 °
32.9 °
49 %
5.7kmh
18 %
Mon
33 °
Tue
31 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page