• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांचीही प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर :
येथील कागल शहरात बॅरिस्टर खर्डेकर चौक येथे प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचीही प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
त्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा परिसरसरासह स्मारकाची आणि ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिराच्या इमारतीची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने यांनी रविवारी पाहणी केली.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे गाव म्हणून आणि न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले शिकलेली शाळा म्हणून श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिरासाठी एक कोटी रुपये मिळाले होते. ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. कागलमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर प्रभू श्री राम मंदिर दर्शन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
कागलमधील बॅरिस्टर खर्डेकर चौकात पुतळ्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस राधानगरी धरण भरल्यानंतर उघडणाऱ्या सात दरवाजांची प्रतिकृती तयार केली आहे. तो पाण्याचा प्रवाह चांगला पडला पाहिजे. तसेच; एकूणच कार्यक्रम दिमाखदार झाला पाहिजे, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.
——————————
कागलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

