कोल्हापूर :
चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळला ३ विरूध्द २ गोलफरकाने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिलबहारच्या विजयात मोलाचा वाटा उचलेला स्वयंम साळोखे सामनावीर ठरला. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीतील सामना रविवारी (दि.१२) पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता होईल.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर शनिवारी दिलबहार आणि फुलेवाडी संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात दिलबहारकडून झालेल्या चढाईत थांगजालेन हाओकिपने मोठ्या डीमधून दिलेल्या पासवर स्वयंम साळोखेने हेडव्दारा गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. ११व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर २६व्या मिनिटास लॅमखोलेन दौंगेलच्या पासवर प्रथम भोसलेने गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. चढाईतील सातत्य कायम राखत दिलबहारने ३८व्या मिनिटाला ३-०ची आघाडी घेतली. स्वयंम साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक आविष्कार राऊतने रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यावर ताबा मिळवत स्वयंमने गोल केला. ३९व्या मिनिटाला फुलेवाडीकडून झालेल्या चढाईत विशाल पाटीलने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक जयकुमार मेथेकडून रिबॉन्ड झाला त्यावर सत्येन पाटीलने गोल नोंदवून आघाडी कमी केली.
उत्तरार्धात डी टॉपवरून दौंगेलने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टवरून गेला. स्वयंम साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली .त्यांच्या प्रथम भोसले, माणिक पाटील, फेबिन गिब्स, संकेत वेसणेकर, थांगजालेन हाओकिप यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी खोलवर चाली रचल्या परंतु त्यांना त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात आले नाही. फुलेवाडीकडून सत्येन पाटील, मारुती कोळी, विशाल पाटील, सिध्दार्थ पाटील, अक्षय मंडलिक, आयुष पाटील, अक्षय पाटील यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी वेगवान चाली रचल्या. दिशाहीन फटके व समन्वयाअभावी त्यांना यश मिळाले नाही. अखेर जादावेळेत सत्येन पाटीलने गोल नोंदवून आघाडी ३-२वर आणली. उर्वरित वेळेत मात्र त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही, त्यामुळे दिलबहारने ३-२ अशा गोलफरकाने सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली.
——————————
दिलबहारचा उपांत्य फेरीत प्रवेश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
33
°
C
33
°
31.9
°
55 %
7.2kmh
0 %
Wed
33
°
Thu
30
°
Fri
31
°
Sat
31
°
Sun
32
°

