कोल्हापूर :
काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा रविवारी (दि.१२) ५४ होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाणार आहे. ‘देऊया गरजूना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात’ हे ब्रीद घेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी या वाढदिवसाला विधायक रूप देत दातृत्वाचा जागर करणार आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस होत असल्याने कॉग्रेस पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपपासून फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बैलगाडी शर्यत, फळे वाटप, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरासह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार सतेज पाटील हे रविवारी दुपारी ३ नंतर कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ आणू नयेत त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

