कोल्हापूर :
छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टीचा आणि कोल्हापूरच्या वैभवशाली स्थापत्यशास्त्राचा साक्षीदार असलेल्या ‘विल्सन पुला’ला मंगळवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित शताब्दी सोहळा उत्साहात पार पडला.
राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि छत्रपती राजाराम महाराजांची दूरदृष्टी यांचा संगम असलेल्या, लक्ष्मीपुरी येथील ऐतिहासिक ‘विल्सन पुला’ने आपल्या सेवेची १०० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून कोल्हापूरमधील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींच्यावतीने पुलाचा ‘शताब्दी वाढदिवस’ मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञ भावनेने साजरा करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी ठीक ५ वाजता विल्सन पुलावर या सोहळ्याला सुरुवात झाली. हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधिनी आणि समिट ॲडव्हेंचर या संस्थांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, शिवसेनेचे विजय देवणे, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, अमरजा निंबाळकर, उमाकांत रानिंगा, अजेय दळवी, मनजित माने, चंदन मिरजकर, आसिफ मोकाशी, प्रशांत हडकर, सागर बगाडे, अजित अकोळकर आदींसह इतिहासप्रेमी उपस्थित होते.
प्रारंभी विल्सन पुलाचे विधिवत पूजन करण्यात आले. फुलांच्या माळा आणि रोषणाईने सजलेला हा पूल जणू आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत होता.
याप्रसंगी उदय गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव, विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
केवळ उत्सव साजरा न करता, या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आणि तिचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थितांनी ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याचा आणि त्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा सामुहिक संकल्प केला. मनजीत माने यांनी आभार मानले
कोल्हापूरच्या ‘विल्सन पुला’चा शताब्दी सोहळा उत्साहात
Mumbai
smoke
35
°
C
35
°
33.9
°
55 %
4.6kmh
40 %
Sat
35
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°

