• ६ संस्थांना २५.८४ कोटी रुपयांची मदत
कोल्हापूर :
महिलांचा डिजिटल सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘शी-कनेक्ट्स डिजिटल ॲक्सेलरेटर : इंडिया’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी सहा स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्था पुढील १५ ते १८ महिन्यांत आरोग्य, उपजीविका आणि शिक्षणाशी संबंधित डिजिटल उपाययोजनांद्वारे सुमारे १० लाख महिलांपर्यंत पोहोचणार आहेत.
यासोबतच या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ सप्टेंबर २०२६ आहे. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सरकार, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था, परोपकारी संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी दुसऱ्या टप्प्यासाठी ‘रिक्वेस्ट फॉर ॲप्लिकेशन’ देखील जारी करण्यात आले.
रिलायन्स फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख दीप्ती रेड्डी म्हणाल्या की, महिलांना डिजिटल विश्वात आत्मविश्वास आणि संधी उपलब्ध करून देणे हे समान आणि सर्वसमावेशक भविष्य घडविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्या की त्या केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाहीत, तर संपूर्ण समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. पहिल्या टप्प्यात अशा सक्षम भागीदार संस्था आमच्यासोबत जोडल्या गेल्याचा आम्हाला आनंद आहे.
गेट्स फाउंडेशनच्या जेंडर इक्वॅलिटी विभागाच्या उपसंचालिका साची भल्ला म्हणाल्या की, ‘शी-कनेक्ट्स डिजिटल ॲक्सेलरेटर’ स्वयंसेवी संस्थांना महिलांचा डिजिटल सहभाग वाढविणारे प्रभावी उपाय विकसित करण्याची आणि ते व्यापक स्तरावर राबविण्याची संधी उपलब्ध करून देईल. या उपक्रमातून मिळणारे अनुभव भारताबरोबरच ग्लोबल साऊथमधील इतर देशांसाठीही उपयुक्त ठरू शकतात.
पहिल्या टप्प्यात एकूण २५.८४ कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यासाठी सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये PCI इंडिया, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन, मैना महिला फाउंडेशन, डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन, ASPIRE आणि चैतन्य या संस्थांचा समावेश आहे. या संस्था ग्रामीण महिला, स्वयं-सहाय्यता बचत गट, महिला उद्योजक तसेच किनारी भागातील महिलांसाठी डिजिटल कौशल्य, आरोग्य सेवा आणि उपजीविकेशी संबंधित उपाय विकसित करणार आहेत.
रिलायन्स फाउंडेशनचा ‘शी-कनेक्ट्स’ उपक्रम १० लाख महिलांपर्यंत पोहोचणार
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
11.1kmh
100 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°

