कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आयोजित व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत उपांतपूर्व फेरीतील सामने उत्साहात पार पडले.
के.एस.ए.च्या साठमारी येथील टेनिस कॉम्लेक्स् येथे स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटात अनय सुमंत, अदित्य जाधव, हिमांशू देसाई, कृष्णराज शर्मा, रेयांश गुंद, क्रीश सरोज, बलराज बिराजदार आणि आहान जैन यांनी आपापले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. काही सामने एकतर्फी झाले, तर कृष्णराज शर्मा व रेयांश गुंद यांच्या सामन्यांत चुरस पाहायला मिळाली.
मुलींच्या गटात अस्मी पित्रे, अलिया रहिम, देविका पिंगे, ईशिता पाटील, त्रिशा रजपूत, समारिया ठाकूर, काव्या हळदुले आणि प्रियदर्शिनी पार्टे यांनी विजय मिळवला. अलिया रहिम व प्रियदर्शिनी पार्टे यांच्या लढतीत तीन सेटपर्यंत सामना रंगून स्पर्धेची रंगत वाढली.
एआयटीए मानांकित १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत उपांतपूर्व फेरीचे सामने रंगतदार
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

