कोल्हापूर :
बावधनमधील व्हॅलोनिया सोसायटीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालगोपाळ विठ्ठल, रखुमाई आणि वारकऱ्यांच्या पोशाखात मोठ्या उत्साहात आणि आनंदात सामील झाले. ज्येष्ठ नागरिकांनी खास तयार केलेल्या पालखीची मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. हरिनामाचा गजर करत सर्व लहान मुलांनी या पालखीचा आनंद लुटला.
लहान मुलांमध्ये धार्मिक मूल्य रुजावी आणि आपल्या संत परंपरांची ओळख व्हावी हा या पालखी मागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी सोसायटीमधील ज्येष्ठ महिलांच्यावतीने लहान मुलांना आषाढी एकादशीचे महत्व समजावून सांगण्यात आले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेचे महत्व यावेळी सांगण्यात आले.
या पालखीचे आयोजन सोसायटीमधील ज्येष्ठ महिला वृषाली बर्वे, शोभा तेलंग, भारती चिडगुपकर, सुचेता सारडा, ज्योती आवटी, नीता शहा, सुविद्या करमरकर, सुप्रिया बर्वे, सुहास ढेकणे, चंदा बनकर यांनी केले. यावेळी सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
व्हॅलोनिया सोसायटीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी काढली पालखी
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

