कोल्हापूर :
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान येथे डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘आषाढी एकादशी सेवा शिबिर’ राबवण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील ७० स्वयंसेवकांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी निःस्वार्थपणे कार्य केले.
यादिवशी स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील स्वच्छता, भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप, दर्शन रांगेचे व्यवस्थापन, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांना सहकार्य, तसेच विठ्ठल मंदिर प्रशासनाला विविध कामांमध्ये मदत करून सेवाभावाचे दर्शन घडविले.
विठ्ठल मंदिर देवस्थान अध्यक्ष भीमराव पाटील यांनी स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन करताना सांगितले की, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व समर्पित पद्धतीने सेवा बजावली. त्यांच्या मदतीमुळे दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत पार पडली. अशा सेवाभावी विद्यार्थ्यांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, पाच वर्षांपूर्वी २० स्वयंसेवकापासून सुरु झालेली ही सेवा आज ७० स्वयंसेवकांपर्यंत पोहचली आहे. अशा सेवा कार्यात टेक्निकल कॅम्पसचा नेहमीच पुढाकार राहील.
रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता केदार एस. रेडेकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘नॉट मी बट यू’ हे ब्रीद वाक्य विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. समाजासाठी वेळ देणे, लोकांच्या अडचणी समजून घेऊन मदतीचा हात देणे आणि सेवेमधून माणुसकी जपणे हीच या शिबिराची खरी शिकवण आहे.
यावेळी रासेयो अधिकारी केदार एस. रेडेकर, प्रा. राजवर्धन पाटील, मुकेश भट उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, टेक्निकल कॅम्पस संचालक डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असिस्टट रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
डी. वाय. पाटील टेक्निकलच्या स्वयंसेवकांचे ‘आषाढी एकादशी सेवा शिबीर’
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
70 %
5.1kmh
7 %
Fri
31
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

