कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) आणि राजाराम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पेशल फिटनेस मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. राजाराम कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये शनिवारी (दि. २५) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेस महाराष्ट्र रणजी संघ, पश्चिम विभागीय दुलीप ट्रॉफी संघ तसेच बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील सेंटर ऑफ एक्सलन्सचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक महेश पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. त्यांनी क्रिकेटपटूंसाठी शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व, दैनंदिन सरावाचे नियोजन, सामन्यापूर्वीची तयारी, योग्य स्ट्रेचिंग, धावा घेताना योग्य धावण्याची पद्धत, दुखापती टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, दुखापत झाल्यास उपाययोजना, सामन्यानंतर शरीराची रिकव्हरी आणि संतुलित आहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनासोबतच प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादरीकरण आणि मैदानावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रारंभी केडीसीएचे सहसचिव डॉ. संजय पाठारे यांनी महेश पाटील यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश हजारे, सीडीसी अध्यक्ष राजेश केळवकर, डॉ. सुशांत महाजन, राजाराम कॉलेजचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक अथर्व देवण्णावर, मुद्दसर मुल्ला तसेच मोठ्या संख्येने खेळाडू,
केडीसीए व राजाराम कॉलेजतर्फे क्रिकेट फिटनेस मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

