• खासदार धनंजय महाडिक यांचे केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन
कोल्हापूर :
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या मानधन रचनेत बदल करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन दिले.
राज्यातील सीएचओएस संघटनेकडून शासनाकडे मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएचओएस म्हणजे डॉक्टर आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाते, ज्यामध्ये २५ हजार रुपये निश्चित वेतन आणि १५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता असतो. मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून, ३५ हजार रुपये निश्चित वेतन आणि ५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणार्या आरोग्य कर्मचार्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी, नामदार नड्डा यांच्याकडे केली.
दरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माता आणि बाल आरोग्य, आजारांचे स्क्रिनिंग आणि जनजागृतीमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. त्यामुळे केंद्र सरकारकडून या कर्मचार्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक लक्ष द्यावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे.
——————————
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचार्यांच्या मानधन रचनेत बदल करण्याची मागणी
Mumbai
broken clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
69 %
4.1kmh
79 %
Sun
31
°
Mon
30
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
31
°

