कोल्हापूर :
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने १५ एप्रिलपासून मोफत फुटबॉल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात १२ ते १६ वयोगटातील मुलांना सहभाग घेता येणार आहे. राजोपाध्येनगर ग्राऊंड, सानेगुरुजी वसाहत येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत हे शिबीर होईल. शिबिराचे यंदा २७ वे वर्ष आहे.
लहान वयातच मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरादरम्यान किरण साळोखे, उदय पाटील, प्रमोद भोसले, आशिष पाटील, सुशील गायकवाड यांच्यासह अनुभवी व जेष्ठ खेळाडूंकडून मार्गदर्शन केले जाणार असून, खेळातील मूलभूत कौशल्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.
फुटबॉल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच खेळाची आवड असलेल्या मुलांसाठी ही उत्तम संधी असून, इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील यांनी केले आहे.
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने उद्यापासून मोफत फुटबॉल शिबिर
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

