कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकास कक्ष कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक डॉ. सुजित मिणचेकर व संचालक मंडळाच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले, तर आभार डॉ. दयानंद काळे यांनी केले.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. दयावर्धन कामत, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. एम. पी. पाटील, एस. आर. पाटील, अशोक पुणेकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
‘गोकुळ’मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Mumbai
light rain
28.2
°
C
28.2
°
28.2
°
81 %
7kmh
78 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°

