कोल्हापूर :
१४ एप्रिल १९४४ या दिवशी एस. एस. फोर्ट स्टिकींग जहाजला व्हिक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भीषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे ६६ जवान शहीद झाले. त्यांच्या बलिदानाबद्ल अग्निशमन सेवा दिन व सप्ताह साजरा करण्यात येतो.
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सासने मैदान, फायर स्टेशन येथे अग्निशमन सेवा दिनानिमित्त अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत, श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक विशाल चव्हाण, नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी दस्तगीर मुल्ला, ओंकार खेडकर, जयवंत खोत, कांता बांदेकर अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सासने मैदान फायर स्टेशन – कावळानाका- व्हिनस कॉर्नर- लक्ष्मीपुरी- बिंदू चौक- मिरजकर तिकटी- महाद्वार रोड- पापाची तिकटी- महापालिका मुख्य कार्यालयापर्यंत अग्निशमन गाडी व दुचाकीवरुन रॅली काढली.
महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने सोमवार, दि.१८ एप्रिल २०२६ पासून अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये शाळा, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन दलाची सुरक्षेच्या दृष्टीने प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.
महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
82 %
5.4kmh
98 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

