कोल्हापूर :
केदार केळकर यांनी शास्त्रीय गायनातून केलेला स्वराविष्कार, ग्वाल्हेर- जयपूर घराण्याच्या घरंदाज गायकीचा वसा आणि वारसा युवा पिढीमध्ये जपणाऱ्या गौतमी चिपळूणकर यांचे गायन अशी दुहेरी स्वरानुभूती संगीतप्रेमी रसिकांना आली. गायन समाज देवल क्लब, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई आणि सिटी बँक, न्यूयॉर्क यांच्या सहसंयोजनाने देवल क्लबच्या बाळासाहेब घाटगे कलादालनात ही सायंकालीन स्वरमैफल आयोजित केली होती.
पहिल्या सत्रात केदार केळकर यांनी षड्ज पंचमाचा आधार नसलेल्या सायंगेय ‘मारवा’ रागातील ‘जान गुनिजान’ ही विलंबित एकतालातील बंदिश स्वरविस्तारासाठी निवडली होती. त्यानंतर गुणीदास पंडित जगन्नाथबुवांची ओ गुणीजन मिल गाव बजाओ ही द्रुत एकतालातील रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. सर्वांग सुंदर मारव्यानंतर केदार यांनी भूप रागातील ‘अबीर गुलाल’ ही रचना आद्ध्या त्रितालामध्ये सादर केल्यानंतर एक निरगुणी भजन सादर केले. केदार यांना तबला व हार्मोनियमची साथ प्रदीप कुलकर्णी व संदीप तावरे यांनी केली.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र कोल्हापूरच्या गौतमी चिपळूणकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने गाजवले. गौतमी यांनी जयपूर अतरौली घराण्याची खासियत असलेल्या ‘नायकी कानडा’ रागातील विलंबित झुमरा तालामध्ये निबद्ध असलेल्या अदारंग बिनती करत’ या बंदिशीने केला. आकारयुक्त खुला आवाज, राग स्वरूपाची शिस्तबद्ध बढत, आकर्षक बोलताना, दमदार व जोरकस गमकेची तानक्रिया इत्यादी ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचा वैशिष्ट्य यांची जपणूक करीत गौतमी यांनी घराणेदार गायकीचे सुश्राव्य दर्शन घडविले.
नायकी कानडा रागानंतर गौतमी यांनी मालकंस या रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातील ‘सोवन देरे’ या मध्य लय त्रितालातील बंदिशीने दोन तासाहून अधिक काळ रंगलेल्या स्वरमैफिलीची सांगता केली.
गौतमी यांना संवादिनीची साथ स्वरूप दिवाण यांनी तर तबल्याचे साथ संगत गिरीधर कुलकर्णी यांनी अतिशय समजदारपणे व गाण्याला उठाव आणणारी अशी केली.
प्रास्ताविक व कलाकारांचा परिचय मनीष आपटे यांनी करून दिला. कलाकारांचे स्वागत श्रीकांत डिग्रजकर, सचिन पुरोहित, राजेंद्र पित्रे व भाग्यश्री मुळे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. विनोद ठाकुरदेसाई डॉ. रंजन कुलकर्णी अविनाश व मीरा सहस्त्रबुद्धे, वंदना आठले, रमा कुलकर्णी, प्रशांत देसाई, भास्कर देसाई यांच्यासह संगीतप्रेमी रसिकांची उपस्थिती होती.
——————————
गान प्रतिभेचा मनोहारी आविष्कार
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
57 %
0kmh
88 %
Fri
26
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
26
°

