कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस (पॉलिटेक्निक), तळसंदे येथील डिप्लोमाच्या ९२ विद्यार्थ्यांची टीई कनेक्टिव्हिटी या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक २.४ लाख रुपये पॅकेज मिळाले आहे.
महाविद्यालयमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हद्वारे हि निवड झाली आहे. टीई कनेक्टिव्हिटी ही जागतिक स्तरावर कार्यरत इलेक्ट्रॉनिक्स व औद्योगिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कंपनी आहे.
या ड्राईव्हमध्ये इलेक्ट्रिकल विभागाच्या २७, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनच्या २१, मॅकेनिकलच्या २० आणि कॉम्पुटर विभागाच्या २४ अशा एकूण ९२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले.
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ९२ विद्यार्थ्यांची टीई कनेक्टिव्हिटीमध्ये निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3
°
C
28.3
°
28.3
°
82 %
9kmh
8 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°

