कोल्हापूर :
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ हा दिव्यांग मेळावा गोवा येथे ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा भव्य मेळावा दिव्यांग व्यक्तींच्या समान सहभागाला प्रोत्साहन देणे, दिव्यांग हक्क चळवळीचे ध्येय साध्य करणे आणि समाजात समावेशकता वाढवणे या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी चारचाकी वाहन चालवित निघालेल्या दिव्यांग गटाचे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत हिरवा झेंडा दाखवला आणि मार्गस्थ केले.
यावेळी कोल्हापूर शहरातील विनय कुमार मदन मोहन लोहिया कर्णबधिर विद्यालय, जिज्ञाशा मतिमंद शाळा, चेतना मतिमंद शाळा, स्वयं मतिमंद शाळा आणि हॅंडीकॅप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा या संस्थांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातून चारचाकी वाहनाने आलेल्या या दिव्यांग गटात कानपूरचे सुनिल मंगल यांच्यासह वीर सिंग संधू, बलविंदर सिंग व इतर सहभागींचा समावेश होता. ते त्या-त्या राज्यांतून प्रवास करीत पुणे-कोल्हापूर मार्गाने गोव्याकडे रवाना झाले. यावेळी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे उपस्थित होत्या.
या अभियान यात्रेचा मुख्य उद्देश दिव्यांगांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करणे, त्यांना क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रेरित करणे आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन पसरवणे हा आहे. पायाने अपंग असूनही या यात्रेकरूंनी चारचाकी वाहन चालवणे शिकून अधिकृत परवाने मिळविले आहेत. समाजात दिव्यांगांना सर्वाधिक अडचण येते ती म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करणे. या आव्हानावर मात करण्यासाठी त्यांनी वाहनांमध्ये आवश्यक बदल करून परवाने मिळवले आणि आता ‘आम्ही पूर्णपणे स्वयंपूर्ण झालो’ असे अभिमानाने सुनिल मंगल यांनी यावेळी सांगितले.
यातील वीर सिंग संधू हे दिव्यांग क्रिकेटपटू म्हणून भारताकडून खेळतात. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी सर्वजण दिव्यांगांना सक्षमीकरणाचा संदेश देत आहेत. हा प्रवास केवळ गोव्यापुरता मर्यादित नसून, तो स्वावलंबन आणि समानतेची प्रेरणा देणारा एक चळवळीचा भाग आहे. अशा यात्रांमुळे समाजातील दृष्टिकोन बदलण्यास आणि दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
——————————————————-
दिव्यांग अभियान यात्रेचे प्रशासनाकडून स्वागत
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

