Homeइतरआमदार रोहित पवारांकडून 'दत्त'च्या क्षारपड जमीन मुक्ती प्रकल्पाचे कौतुक

आमदार रोहित पवारांकडून ‘दत्त’च्या क्षारपड जमीन मुक्ती प्रकल्पाचे कौतुक

कोल्हापूर :
शिरोळच्या दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपड मुक्त जमिनीचे काम दिशादर्शक आहे. शिवाय सेंद्रिय बीज भांडारातून पुढच्या पिढीला आरोग्य चांगले मिळावे, यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
बारामतीचे कृषीभूषण राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेगुलंद राबवलेल्या ‘क्षारपड जमीन मुक्ती’ प्रकल्पाची आणि शेडशाळ येथील महिला सेंद्रिय बीज भांडाराची प्रत्यक्ष पाहणी करून या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
​ ​         कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथे सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे ७५० एकर जमीन क्षारपड मुक्त करण्यात आली आहे. या कामाची पाहणी करताना रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. एकूण २३ गावांमध्ये १० हजार एकर क्षेत्रावर प्रकल्पाचे नियोजन ​करून २१० किमी मुख्य पाईपलाईन आणि ४,५०० एकरवर अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण. झाले असून ज्या जमिनीत गेल्या ४०-५० वर्षांपासून काहीही पिकत नव्हते, तिथे आता एकरी ६० ते ७० टन ऊसाचे उत्पादन निघत असल्याची माहिती उद्यानपडीत गणपतराव पाटील व मुख्य शेती अधिकारी श्रीशैल यांनी सांगितले.
​आमदार रोहित पवार यांनी या तंत्रज्ञानाचे आणि अंमलबजावणीचे कौतुक करत हा प्रयोग राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे नमूद केले.
शेडशाळ येथील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सेंद्रिय बीज भांडाराला भेट दिल्यानंतर रोहित पवार भारावून गेले. महिलांच्या या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ​महिलांना सेंद्रिय वस्तू विक्री आणि पॅकिंगच्या आधुनिक प्रशिक्षणासाठी पुणे व बारामती येथे येण्याचे निमंत्रण दिले.
​गटशेती आणि सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
​              गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे प्रयोग सामान्य शेतकऱ्याला आर्थिक समृद्धीकडे नेणारे आहेत. ​’दत्त’चा क्षारपड मुक्तीचा प्रकल्प दिशादर्शक असून हा प्रकल्प बारामती या भागात ही राबवता येईल असे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, संचालक भैय्यासाहेब पाटील, दरगु गावडे, विजय सूर्यवशी, प्रमोद पाटील, संजय पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, इंजिनिअर सुदर्शन तकडे, अशोक पाटील, वरुण पाटील, रावसो चौगुले, गजानन चौगुले, अविनाश कदम, किरण संकपाळ यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि बीज भांडारातील महिला सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
18 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page