कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचे ५ ते १७ मे २०२६ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. दि.५ मे रोजी दुपारी २ वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरूध्द वर्षाविश्वास तरुण मंडळ तर दुपारी ४ वाजता पाटाकडील तालीम मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल.
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेविषयी महापौर सौ. रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, या स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या ‘ए’ डिव्हिजनमधील १६ संघ सहभागी आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला रु. १ लाख ५० हजार आणि चषक, तर उपविजेत्या संघाला रु. ७५ हजार आणि चषक बक्षीस देण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट गोलकीपर, डिफेन्स, हाफ आणि फॉरवर्ड या खेळाडूंना प्रत्येकी रु. १०,००० व चषक, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस रु. २०,००० व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघांना प्रत्येकी रु. १०,०००, दुसऱ्या फेरीतील संघांना प्रत्येकी रु. २०,००० तसेच उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांना प्रत्येकी रु. ३०,००० देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूस ट्रॅकसूट देऊन गौरव केला जाईल.
पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, स्पर्धा संयोजन समिती प्रमुख विजयसिंह खाडे-पाटील आदी उपस्थित होते.
१६ रोजी प्रदर्शनीय सामना….
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त १६ मे रोजी दोन प्रदर्शनीय सामने होणार आहेत. कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ विरूध्द कोल्हापूर महानगरपालिका फुटबॉल संघ हा सामना दुपारी चार वाजता तर दुपारी पाच वाजता लोकप्रतिनिधी संघ विरूध्द प्रशासकीय अधिकारी संघ यांच्यात सामना होणार असल्याचे नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी सांगितले.
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचा आज किक-ऑफ
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

