कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष (खुला गट) फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा टियर-१ फायनल राऊंड दि. ५ ते ९ मे या कालावधीत कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. गतवर्षीचा विजेता के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ यंदाही विजेतेपद टिकवण्यासाठी सज्ज झाला आहे.
के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाची स्पर्धेसाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर नुकतेच छत्रपती शाहू स्टेडियम येथे पार पडले. के.एस.ए. फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक केतन आडनाईक, युवराज पाटील आणि अनिल अडसूळे यांनी शिबिरात खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन देत उत्कृष्ट सराव करून घेतला.
के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघात गोलरक्षक म्हणून अमर गवळी, आविष्कार राऊत तर खेळाडू म्हणून अरबाज पेंढारी, विशाल पाटील, ऋतुराज संकपाळ, ऋतुराज सूर्यवंशी, अमन सय्यद, राज अली, दर्शन पाटील, संकेत जरग, राहुल पाटील, ओंकार मोरे, संकेत साळोखे, हर्ष जरग, सिद्धेश साळोखे, रोहित पोवार, करण चव्हाण-बंदरे, अमीन खजीर, स्वयंम साळोखे, प्रभू पोवार यांचा समावेश आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक केतन आडनाईक व संघ व्यवस्थापक अनिल अडसुळ हे आहेत.
के.एस.ए.च्या पेट्रन सौ. मधुरिमाराजे छत्रपती व जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जॉ.जनरल सेक्रेटरी प्रा. अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व सदस्य नितीन जाधव, दिपक घोडके, प्रदीप साळोखे व युवराज पाटील यांन प्रशिक्षक व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या.
या संघास केएसएचे पेट्रन-इन-चीफ श्री शाहू छत्रपती महाराज, श्री संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले.
——————————
राज्यस्तरीय आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी केएसए कोल्हापूर संघ सज्ज
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
26 %
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

