Homeकला - क्रीडापाटाकडील आणि वेताळमाळची विजयी सलामी

पाटाकडील आणि वेताळमाळची विजयी सलामी

• महापौर चषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात
कोल्हापूर :
महापौर फुटबॉल चषक स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ८-३ गोलने तर वेताळमाळ तालीम मंडळने वर्षाविश्वास तरुण मंडळवर ३-० गोलने मात करून विजयी सलामी दिली. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, राजेश लाटकर, मुरलीधर जाधव, इंद्रजीत बोंद्रे, आदिल फरास, विजयसिंह खाडे- पाटील, रविकांत अडसूळ, किरणकुमार धनवाडे, संजय मोहिते, सचिन पांडव आदींसह नगरसेवक – नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.
पाटाकडील आणि सुभाषनगर यांच्यातील सामन्यात ८ व्या मिनिटाला रोहित पवारने मैदानी गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १५व्या मिनिटाला त्याने वैयक्तिक तसेच संघाचाही दुसरा गोल केला. ३२व्या मिनिटाला ओमकार मोरेने डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर थेट गोलजाळ्याचा वेध घेतला. पूर्वार्धात ३-० आघाडी घेतली.
उत्तरार्धात ४६व्या मिनिटास यशराज कांबळेने दिलेल्या पासवर ओमकार मोरेने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल केला. लगेचच झालेल्या चढाईत प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडव्दारा गोल नोंदवून संघाची आघाडी ५-० अशी केली. त्यानंतर झालेल्या चढाईत ओमकार मोरेने वैयक्तिक तिसरा तर संघाचा सहावा गोल ५३ व्या मिनिटाला करून आघाडी भक्कम केली. यानंतर मात्र सुभाषनगरकडून
५६व्या मिनिटाला नितीन पोवारने गोल नोंदवून आघाडी ६-१ वर आणली. ६१व्या मिनिटाला पाटाकडीलकडून अरबाज पेंढारी याने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने वैयक्तिक दुसरा तर संघाचा सातवा गोल फलकावर झळकवला. ६७व्या मिनिटास अरबाज पेंढारीने वैयक्तिक गोल नोंदवत संघाची आघाडी ८-१ अशी केली. यानंतर सुभाषनगरकडून झालेल्या चढाईत आर्यन पंधारेने ६८ व्या आणि ७३ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी ८-३ वर आणली. अखेर उर्वरित वेळेत ८-३ ची आघाडी राखत पाटाकडीलने विजयावर शिक्कामोर्तब केले.
वेताळमाळ तालीम विजयी….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने वर्षाविश्वास तरुण मंडळचा ३-० गोलने पराभव केला. पहिल्या अर्ध्या तासात दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची नोंद झाली नाही. पूर्वार्धात रोहित पोवारने ३५व्या मिनिटाला गोल करून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर प्रणव कणसेने संघासाठी दुसरा गोल ३८व्या मिनिटाला केला. उत्तरार्धात ८०व्या मिनिटाला आकाश मोरेने गोल नोंदवून आघाडी ३-० अशी केली. वर्षाविश्वासकडून अजिंक्यराज पाटील, केतन माने चांगला खेळ केला पण अखेरपर्यंत गोलची आघाडी कमी करण्यात यश मिळाले नाही. अखेर उर्वरित वेळेत ३-०ची आघाडी ठेवत वेताळमाळने विजयाला गवसणी घातली.
    ——————-
आजचे सामने….
• दिलबहार – संध्यामठ : दुपारी २ वाजता
• शिवाजी – रंकाळा : दुपारी ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4 ° C
28.4 °
28.4 °
78 %
5.9kmh
89 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page