Homeसामाजिक'गोकुळ’तर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य व टीएमआर मॅश वाटप

‘गोकुळ’तर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य व टीएमआर मॅश वाटप

कोल्हापूर :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक (गोकुळ) दूध संघामार्फत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी व पशुपालकांना मदतीचा हात दिला. गोकुळच्यावतीने महालक्ष्मी पशुखाद्य १० मे.टन व टीएमआर मॅश ८ मे.टन हि मदत मंगळवारी (दि.७) सोलापूर जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचेकडे संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, बयाजी शेळके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सुपूर्द करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पुराचा तडाका अनेक गावांना व वाड्या-वस्त्यांना बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये घरांचे शेतपिकांचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले असून यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मागणी पत्रानुसार गोकुळ दूध संघाने एक सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त भागातील गायी-म्हैशी, लहान वासरे यांना मोफत पशुखाद्य देऊन मदत करण्याचा निर्णय गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाने घेतला. त्यानुसार गोकुळ दूध संघाने सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट आदर्श ठेवत पूरग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना तातडीची मदत पोहोचवून संवेदनशील भूमिका बजावली याबद्दल सोलापूर प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त केले आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, बयाजी शेळके, सैफन नदाफ (तहसीलदार व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), रवींद्र मोहिते (गोकुळ दूध विक्रेता, सोलापूर), डॉ. सत्यजित पाटील व पशुखाद्य मार्केटिंग प्रतिनिधी रवींद्र लाड उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page