Homeकला - क्रीडाबुध्दीबळ स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

बुध्दीबळ स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग भडगाव, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल महिला व पुरुष बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचा महिला बुद्धिबळ संघ विजेता ठरत जनरल चॅम्पियनशिप मिळवली.
तसेच पुरुष गटात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. बुद्धिबळ महिलांमध्ये सृष्टी कुलकर्णी बी.बी.ए. भाग ३ – तृतीय क्रमांक,  मुक्तांजली सावंत बी.कॉम. भाग ३ – ५ वा क्रमांक तर पुरुषांमध्ये ऋषिकेश कबनुरकर – बी.कॉम. भाग १ – प्रथम क्रमांक यांनी यश मिळविले.
या यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page