Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन  संशोधक देशात ‘टॉप टेन’मध्ये

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन  संशोधक देशात ‘टॉप टेन’मध्ये

• डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी
कोल्हापूर :
पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकांनी ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट  कॉम या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्थेने जाहीर केलेल्या या यादीत सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे तिसरे तर  संशोधन संचालक डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी आठवे स्थान मिळवले आहे.
रिसर्च डॉट कॉमच्या अहवालानुसार, देशातील अव्वल संशोधकांची निवड डी  इंडेक्स, संशोधनपत्रांची गुणवत्ता, संदर्भ, आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली. डॉ. चंद्रकांत डी. लोखंडे यांचा डी इंडेक्स, १०८ असून त्यांच्या संशोधन कार्याला ४१ हजार ७६४ हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा ७२५ वा क्रमांक आहे. तर डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा डी इंडेक्स ९१ असून त्यांच्या संशोधनाला २९ हजार १६० हून अधिक संदर्भ मिळाले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना १५५४वा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही या यादीत १८५वे स्थान मिळवले आहे. त्यांचा डी इंडेक्स ४९ असून त्यांच्या संशोधनाला ६९४१ संदर्भ मिळाले आहेत.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा, नॅनोतंत्रज्ञान, सुपरकॅपॅसिटर, सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन केले असून अनेक संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदविण्यात आले असून संशोधनाधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकासावर विद्यापीठाचा विशेष भर राहिला आहे. संशोधनपर शेकडो शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डॉ. लोखंडे आणि डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.
           —————-
हे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद : डॉ. संजय डी. पाटील
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करताना सांगितले की, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन आणि नवसंकल्पनांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. डॉ. सी. डी. लोखंडे आणि डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून संशोधन कार्याला आणखी गती मिळेल. संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page