• २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव, मुंबई येथे
कोल्हापूर :
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसजीएमए) व महाराष्ट्र शासनाचा वस्त्रोद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९वे आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. दि.२६ ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान नेस्को एक्झिबिशन सेंटर, हॉल क्र. ४, गोरेगाव (मुंबई) येथे होणार आहे.
या तीन दिवसीय मेळाव्यात देशभरातील १५० हून अधिक ब्रॅण्ड्स सहभागी होणार असून, ३०,००० हून अधिक युनिफॉर्म डिझाईन्स आणि १५,०००+ फॅब्रिक डिझाईन्सचे प्रदर्शन केले जाणार आहे. जागतिक युनिफॉर्म उद्योगासाठी हा सर्वात मोठा सोर्सिंग हब ठरणार आहे.
एसजीएमए फेअरचे चेअरमन अजय रंगरेज म्हणाले की, २०१७ पासून एसजीएमए युनिफॉर्म क्षेत्रात सातत्याने नावीन्य आणत आहे. शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, कॉर्पोरेट, क्रीडा, औद्योगिक, वर्कवेअर, फॅब्रिक, अॅक्सेसरीज, फुटवेअर अशा सर्व प्रकारच्या युनिफॉर्मशी संबंधित गोष्टी एकाच छताखाली या फेअरमध्ये उपलब्ध होतील. जगात हा एकमेव असा व्यासपीठ आहे.
फेअरचे सेक्रेटरी श्रीकांत अंबुरे म्हणाले, नव्या डिझाईन्स व तंत्रज्ञानाधारित मार्केटिंग पद्धतींमुळे हा उपक्रम युनिफॉर्म उद्योगासाठी पहिलाच प्रयोग आहे. वितरक, डीलर्स, रिटेलर्स, शाळा, हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट्स व उद्योजकांनी यात सहभागी होऊन या अद्वितीय व्यासपीठाचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी www.sgma.in येथे भेट द्या किंवा +91-8001900112 या क्रमांकावर संपर्क साधावा.
————–
एआय-आधारित व्हर्च्युअल फॅशन शो…
यंदाच्या फेअरची खास आकर्षण ठरणार आहे, एआय-सक्षम व्हर्च्युअल फॅशन शो. यातून भविष्यातील युनिफॉर्म डिझाईन्स डिजिटल स्वरूपात अनुभवता येतील, ज्यामुळे डिझाईन व्हिज्युअलायझेशन व मार्केटिंगला नवे मार्ग खुलतील. या प्रदर्शनात शालेय गणवेश, हॉस्पिटल युनिफॉर्म, हॉटेल व कॉर्पोरेट युनिफॉर्म, क्रीडावेश, औद्योगिक व वर्कवेअर, ब्लेझर, बेल्ट, टाय, शूज, सॉक्स, बॅग्स, फॅब्रिक्स तसेच वस्त्रउद्योग यंत्रसामग्रीचा समावेश असेल. वितरक, डीलर्स, रिटेलर्स, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स व कॉर्पोरेट खरेदीदारांसाठी हे मोठे नेटवर्किंग व सोर्सिंगचे व्यासपीठ ठरणार आहे.
——————————————————-
मुंबईत आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4
°
C
28.4
°
28.4
°
78 %
5.9kmh
89 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

