Homeशैक्षणिक - उद्योग कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा

कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा

• व्हिजन बैठकीतील सूर
कोल्हापूर :
उद्योगांच्या नवीन संकल्पना दळणवळणाच्या सुविधा आणि कौशल्य विकास या माध्यमातून कोल्हापूर, सांगली व सातारा कॉरिडॉर विकसित करावा असा सूर रविवारी झालेल्या व्हिजन बैठकीत उमटला.
कोल्हापूर, सांगली, सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांची हॉटेल सयाजी येथे बैठक झाली. या तिन्ही जिल्ह्यांची व व्हीजन डॉक्युमेंट तयार करून ती सर्वपक्षीय आमदार, मंत्री आणि सरकार समोर सादर केली जाणार असल्याचे यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील त्यांच्या संकल्पनेतून, कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत या तिन्ही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक व्हिजन बैठक झाली. या बैठकीत, उद्योग, कला, क्रीडा, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, पर्यावरण तज्ञ, बांधकाम व्यवसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सुचना मांडल्या. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यावर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विकासाच्या दृष्टीने सूचना केल्या.
दळणवळणाशी निगडीत साधने आणि पायाभूत सुविधा यांची उभारणी करून औद्योगिक त्याचबरोबर कृषी, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, ॲग्रो टुरिझम, अशा विविध क्षेत्रात प्रगतीच्यादृष्टीने विकास कसा साधता येईल. यावरही या व्हिजन बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली. याची एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या विकासासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना आ. सतेज पाटील यांनी, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे या भौगोलीक परिस्थितीचा फायदा या जिल्ह्यांच्या विकासाकरिता कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांसाठी ड्राय हब, त्याचबरोबर मेट्रो रेल्वे करता येईल काय. त्यासाठी देखील येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  कोल्हापुरातील विमानतळ त्याचबरोबर सर्किट बेंच यामुळे सांगली आणि सातारा या जिल्ह्यांची कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे पुढील १५ वर्षातील विकासाचे नियोजन करूया असे आवाहनही आ. सतेज पाटील यांनी केले.
या बैठकीत कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सूचना मांडल्या. एकूणच निसर्गाशी सुसंगत आणि मानवी मूल्यांशी सुसंगत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार करण्याबाबत अनेकांनी आपले विचार मांडले.
सांगली जिल्ह्यातील चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य सांगली जिल्ह्यातील रवींद्र भानगावे, सांगली जिल्ह्यातील किशोर पठवर्धन, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटचे चेअरमन सचिन पाटील, सांगलीतील मराठा उद्योग क्रांती संघटनेचे चंद्रकांत पाटील, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, राजीव पारिख, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदींनी तीन जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यावर सूचना केल्या. यावेळी उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, व्यवसाय, शिक्षण, संशोधन, माध्यम आदी क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
2.6kmh
100 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page