Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. संजय डी. पाटील यांना राज्य शासनाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार...

डॉ. संजय डी. पाटील यांना राज्य शासनाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

कोल्हापूर :
कृषी, फलोत्पादन, पर्यावरण संवर्धन, शेती आणि शेतकरी विकास आणि कृषी उद्योजकता या क्षेत्रांत गेली अनेक दशके उल्लेखनीय कार्य करणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
डॉ. संजय डी. पाटील यांनी आधुनिक शेती, फलोत्पादन, पर्यावरण संवर्धन, शेतकरी मार्गदर्शन, कृषी उद्योजकता आणि ग्रामीण विकास यांचा प्रभावी संगम घडवून अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. तळसंदे येथील फोंड्या माळावर त्यांनी वनराई फुलविली आहे. तळसंदे येथे शेतीतील विविध प्रयोग ते करत असतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती, उत्पादनवाढ आणि मूल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती पोचविण्याचे काम ही त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना २०२३ सालचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
           ————-
शेती हा सुरुवातीपासून माझ्या आवडीचा विषय आहे. गेल्या अनेक वर्ष शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत आलो आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेऊन शेतीमधील सर्वोच्च पुरस्कार देऊन माझा गौरव केल्याचा क्षण समाधान आणि आनंद देणारा आहे.
– डॉ. संजय डी. पाटील
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
5 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page