कोल्हापूर :
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवार, दि.२३ जून रोजी कोल्हापुरात क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे २५० ते ३०० खेळाडू या रॅलीत सहभागी होणार असून सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
ऑलिम्पिक चळवळीचे जनक पियरे डी कौबर्टिन यांनी २३ जून १८९४ रोजी ग्रीस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या स्मरणार्थ दरवर्षी २३ जून हा दिवस जगभरात ‘जागतिक ऑलिम्पिक डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतात भारतीय ऑलिम्पिक संघ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने १९५२ पासून ऑलिम्पिक डे आणि ऑलिम्पिक सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.
ही रॅली मंगळवारी (दि. २३) सकाळी ७ वाजता भवानी मंडप येथील कीर्ती स्तंभाजवळ क्रीडा ज्योतीचे पूजन करून प्रारंभ होईल. त्यानंतर भवानी मंडप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज मार्गे शाहू स्टेडियम येथे रॅलीचा समारोप होणार आहे
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅली
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

