कोल्हापूर :
विद्यार्थ्यांनी गांजा, मावा, गुटखा व उत्तेजीत द्रव्य इत्यादी पासून दूर राहून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजाला व्यसनाच्या दुष्परिणामाची जनजागृती करावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये नशामुक्त भारत अभियान आयोजन व एनएसएस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
डॉ. टी. एम. चौगुले म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा व नेतृत्वगुण विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी समाजप्रिय होऊ शकतो. या योजनेतून काम करताना विद्यार्थ्यांना स्वच्छता, समाजप्रबोधन, रक्तदान, शासनाच्या विविध उपक्रमाची माहिती देणे, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी कामे समाजासाठी करता येतात.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार म्हणाले, महाविद्यालयाचे काम करत समाजापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उपयोगी पडते. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होते. माणसाला माणसाशी माणसासारखे जगायला एनएसएस शिकवते. श्रमाची प्रतिष्ठा जपल्यामुळे शिस्त, स्वावलंबन इत्यादीमुळे बलवान राष्ट्राची निर्मिती युवा शक्तीद्वारे केली जाते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. आर. बागडे यानी केले. प्रा. हेमंत पाटील यांनी आभार मानले. कु. साक्षी क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख डॉ. बी. टी. दांगट यांनी केली. विद्यार्थ्यांना नशामुक्त अभियानाची शपथ प्रा. ए. बी. वसेकर यांनी दिली. यावेळी डॉ. संदीप पाटील, डॉ. राजश्री पाटील, प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेत नशामुक्त भारत बनविण्याची क्षमता : डॉ. चौगुले
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

