Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये एकदिवसीय युवा महोत्सव माहिती कार्यशाळा संपन्न

विवेकानंद कॉलेजमध्ये एकदिवसीय युवा महोत्सव माहिती कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि विवेकानंद कॉलेज कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) मधील अंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय एकदिवसीय युवा महोत्सव कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. जी. घाणे संचालक विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्यासारख्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे नेतृत्व राज्यस्तरावर, राष्ट्रीयस्तरावर आणि इंद्रधनुष्यमध्ये केले आहे. या स्पर्धेतील यशामुळे शिवाजी विद्यापीठाचा सन्मान वाढला आहे. युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे आणि आपल्या कलेतून स्वतः ला सिद्ध करावे.
अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे हे होते. ते म्हणाले की, आपल्या सर्वांच्या कष्टातून हे विद्यार्थी उभे राहत आहेत. इंद्रधनुष्य, युवा महोत्सव यासारखी व्यासपीठे विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या पंखांना बळ मिळत आहे. आजची ही कार्यशाळा उद्याच्या कलावंत तयार करणारी असेल.
कार्यक्रमासाठी डॉ. आर. एच. अतिग्रे समन्वयक, कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी विकास विभागचे समन्वयक डॉ. आर. एच. अतिग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वासराव नाईक महाविद्यालय चिखलीचे डॉ. प्रमोद पाटील यांनी पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्यस्तरावर, राष्ट्रीयस्तरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव मांडले. संदीप जंगम, बबन माने, संग्राम भालकर, डॉ. शंतनू पाटील, ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, चैतन्य देशपांडे, गणेश इंडीकर, आकाश लिंगाडे, मयुरेश पाटील, सुमंत कुलकर्णी यांनी विविध कला प्रकारानुसार मार्गदर्शन केले.
त्यानंतरच्या सत्रामध्ये कलाप्रकाराचे प्रात्यक्षिक सादरीकरणाव्दारे दाखविण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी. बी. पाटील हे होते. यावेळी श्रीमती एस. टी. आडके, व्ही. बी. इंगवले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आरिफ महात यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. मृणालिनी देसाई यांनी केले तर आभार डॉ. संदीप पाटील यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page