कोल्हापूर :
मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे राखी तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बालवाडीसह सर्व विद्यार्थ्यांनी १५० राख्यांची निर्मिती केली. या राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात येणार असल्याचे माहिती केंद्रमुख्याध्यापक अजित कुमार पाटील यांनी दिली.
या उपक्रमाचे उदघाटन डायट कोल्हापूरच्या अधिव्याख्याता सौ. राणीताई पाटील यांच्या हस्ते झाले. राखी निर्मिती कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून द्वारकानाथ विठ्ठल भोसले हे होते. यावेळी संजय लाड, सुनिल पोवार, निलेश पिसाळ, शरद पाटील, किशोर पाटील, अजित ठाणेकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकांमध्ये अध्यापक सौ. तमेजा मुजावर, अमित पोटकुले, आर. जी. कीर्तिकर, राहुल चौगले, सचिन चौगले, सौ. विद्या पाटील, सौ. दिपाली यादव, उत्तम कुंभार, मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे, शीतल पाटील यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जी. कीर्तीकर यांनी केले तर आभार सौ. दिपाली यादव यांनी मानले.
राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये राखी तयार करण्याचा उपक्रम
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29
°
C
29
°
29
°
74 %
3.6kmh
35 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
27
°

