Homeइतरएन.सी.सी. च्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विवेकानंदच्या छात्रांचे सुयश

एन.सी.सी. च्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विवेकानंदच्या छात्रांचे सुयश

कोल्हापूर :
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर CATC- 304 नुकतेच एनसीसी भवन कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात विवेकानंद कॉलेजच्या छात्रांचे मिळविले.
हे शिबिर ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शस्त्र हाताळणे, फायरिंग, नकाशा वाचन, प्राथमिक उपचार आणि फिटनेसचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यामध्ये विवेकानंद कॉलेजची एनसीसीची विद्यार्थिनी सार्जंट पूर्वा धनंजय चौगुले यांनी कॅम्प सीनियर म्हणून कार्य केले तसेच सार्जंट सृष्टी सचिन पाटील यांनी प्रश्नमंजुषा या उपक्रमात प्रथम पारितोषिक पटकावले आणि सीपीएल प्राची मारुती चव्हाण हिने फिल्ड् सिग्नल या उपक्रमात प्रथम पारितोषिक पटकावले. आणि CQMS विविका कदम हिचा उत्तम माईक कोऑर्डिनेटर म्हणून गौरव करण्यात आला. तसेच CPL श्रुती भोसले हिने नकाशा वाचन या उपक्रमात प्रथम पारितोषिक पटकावले.
या शिबीरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, एन.सी.सी. अधिकारी डॉ. नम्रता नरेवाडीकर यांचे सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page