Homeशैक्षणिक - उद्योग ‘गोकुळ’मध्ये सायलेज निर्मितीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

‘गोकुळ’मध्ये सायलेज निर्मितीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

• नेदरलँड्सच्या तज्ज्ञांकडून पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
कोल्हापूर :
दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स मधील पी.यु.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सायलेज (मुरघास) या विषयावर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
गोकुळ दूध संघ व पी.यु.एम. यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन टप्प्याटप्प्याने दिले जात असून, याआधी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर  नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क हे दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आले होते. त्यांनी विशेषतः सायलेज (मुरघास) या विषयावर सखोल व व्यवसायिक मार्गदर्शन केले. व्हिस्क यांचा स्वतःचा ५०० गायींचा अत्याधुनिक गोठा असून, ते दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलन करतात. ते पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत असून पशुधनासाठीचा चारा देखील सेंद्रिय पद्धतीनेच तयार करतात.
सायलेज निर्मितीची आधुनिक पद्धत, योग्य साठवण तंत्र, तसेच पशुधनासाठी पौष्टिक व गुणवत्तापूर्ण चारा उपलब्ध करून देण्याच्या विविध बाबींवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण सायलेजमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते, पशुपालकांचा खर्च कमी होऊन नफा वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सायलेज तयार करताना कच्चा माल व योग्य वैरणीची निवड, आर्द्रता नियंत्रण, योग्य साठवण आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न शिंदेवाडी येथील वैरण बँक, विविध दूध संस्था तसेच मुक्त गोठ्यांना भेटी देऊन पाहणी केली व मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान गोकुळमार्फत सध्या राबविण्यात येत असलेल्या सायलेज प्रकल्पाची माहिती तसेच दूध उत्पादक पातळीवरील अडचणी मांडण्यात आल्या. त्यावर तज्ज्ञांनी उपाययोजना सुचविल्या. प्रत्यक्ष सायलेज निर्मिती स्थळ पाहणी, गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे व गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांच्या हस्ते हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, डॉ. दयावर्धन कामत, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
69 %
4.1kmh
79 %
Sun
31 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page