• कोल्हापूरात आज-उद्या ‘फॅन पार्क’
कोल्हापूर :
क्रिकेटची लोकप्रिय व बीसीसीआय मान्यता प्राप्त टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धा भारतात वेगवेगळ्या राज्यातील शहरांमध्ये घेतली जात आहे. या स्पर्धेच्या सादरीकरणासाठी व त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बीसीसीआयने भारतात ५० शहरांची व महाराष्ट्रातील नागपूर, सोलापूर कोल्हापूर व रत्नागिरी या चार शहरांची निवड केली आहे. कोल्हापूरमध्ये दि.२३ व २४ मे रोजी ‘फॅन पार्क’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी ॲल्वीन गायकवाड यांनी दिली. यावेळी केडीसीएचे अभिजीत भोसले उपस्थित होते.
अल्वीन गायकवाड म्हणाले की, कोल्हापूरात मेरी वेदर मैदान येथे फॅन पार्क’चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराचा मागील आठ वर्षीच्या प्रेक्षकांच्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे यावर्षी पुन्हा समावेश केला आहे. आत्तापर्यत आयपीएलच्या फॅन पार्कचा भारतातील वेगवेगळया ३५ शहरातील चार लाख क्रीडारसिकांनी आनंद लुटला आहे. दि. २३ व २४ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर बरोबरच तेलगंणा व आसाम या राज्यातील वेगवेगळ्या शहरात टाटा आयपीएलच्या फॅन पार्कचे एकाचवेळी थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे.
या अनुषगांने दि २३ व २४ मे रोजी सायंकाळी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत आयपीएलमधील सामन्याचे दि. २३ मे रोजी सायकांळी ७:३० वाजल्यापासून व दि. २४ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून मेरी वेदर मैदानावर सादरणीकरण केले जाईल. दि. २३ मे रोजी सायकांळी ७:३० वाजता लखनौ सुपर जांईटस् विरूध्द पंजाब किंग्ज, दि. २४ मे रोजी दुपारी ३:३० वाजता मुंबई इंडियन्स विरूध्द राजस्थान रॉयल्स व सायंकाळी ७:३० वाजता दिल्ली कॅपिटल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या तीन सामन्याचे मोठ्या पडद्यावर ३२ बाय १८ इंच (एलईडी स्क्रीन) थेट प्रेक्षपण केले जाणार आहे. कोल्हापूरच्या क्रीडारसिकांना अगदी स्टेडियमसारखा थरार अनुभवता येईल. या फॅन पार्कमध्ये सर्वाच्यासाठी विनामुल्य प्रवेश असणार आहे.
या थेट प्रेक्षपणा बरोबरच फॅन पार्कमध्ये संगीत तसेच विविध स्टॉल्समधुन खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू तसेच आपीएलच्या प्रायोजकांकडुन इतर अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे आतल्या वातावरणात आणखीनच रंगत येईल व थरारात भर पडेल. या दरम्यान मोठ्या संख्येने कोल्हापुरातील अबालवृध्द व महिला प्रेक्षकांना या सामन्याचा प्रत्यक्ष स्टेडियमसारखा अनुभव घेता येईल. जेष्ठ नागरीकांसाठी स्वतत्र बैठक सुविधा असेल.
या उपकमासाठी दोन दिवसांत २० ते २५ हजार लोक ये-जा करतील असा अंदाज आहे. यावेळी लकी ड्रॉ मधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
——————————
आयपीएल टी-२० स्पर्धेच्या सादरीकरणसाठी ‘फॅन पार्क’चे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

