Homeसामाजिकसिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात  मातृत्वाचा मोठा आविष्कार : डॉ.ओमप्रकाश शेट्ये

सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात  मातृत्वाचा मोठा आविष्कार : डॉ.ओमप्रकाश शेट्ये

कोल्हापूर :
परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणजे वंधत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे, असे मत पंतप्रधान जन आरोग्य योजना (आयुष्यमान) व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची एकत्रितपणे अंमलबजावनी करण्याकरीता आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी व्यक्त केले. कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर संचालित सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. ओमप्रकाश शेट्ये पुढे म्हणाले की, भारतात बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. यावरील उपचार अत्यंत खर्चिक असल्यामुळे सामान्य लोकांना ते परवडणारे नाहीत. अशामुळे अनेक कुटुंब अशी आहेत कि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना असे उपचार घेणे शक्य नाही. अशा पार्श्वभूमीवर सिद्धगिरी आय.व्ही.एफ. सेंटर वरदान ठरत आहे. गतकाळाचा आढावा घेतला असता सुमारे ८०० महिला या उपचारामुळे अल्पावधीत मातृत्व सुखास पात्र झाल्या आहेत, हे यशस्वी प्रमाण अतिशय चांगले आहे.
यावेळी डॉ. वर्षा पाटील यांनी त्यांना अत्यंत कमी खर्चात हे उपचार कसे शक्य आहेत याबद्दल विस्तृत मीमांसा केली.  डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी पूर्ण सेंटर व त्यातील सुविधांचा यावेळी आढावा घेतला.
याप्रसंगी विवेक सिद्ध, डॉ. सुषमा नाडेकर, डॉ.चिराग गांधी, अनुराधा शिंदे, डॉ. उज्वला माळी, डॉ. आरती माने, पुनीत मुचंडी, प्रसाद नेवरेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
68 %
5.7kmh
36 %
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page