Homeसामाजिकपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत ६ लाख ४९ हजार रुपये जमा

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत ६ लाख ४९ हजार रुपये जमा

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेट्या मार्च अखेरीस उघडण्यात येतात. बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटी उघडण्यात आली. त्यातून ६ लाख ४९ हजार रुपये मिळाले.
पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी बुधवारी सहा.आयुक्त स्वाती दुधाने, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वरिष्ठ लेखापाल बाजीराव ढोणे, आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार, नंदकुमार पाटील, प्रकाश लोंढे, सुरज घुणकीकर, महेश भोसले व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये रु.४,१९,६७५ रुपये व ऑनलाईन स्वरुपात २,३०,१०९ रुपये अशी एकूण ६ लाख ४९ हजार ७८४ रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे.
यापूर्वी माहे मार्च २०२५ मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल रु.१ लाख ६१ हजार ५३७ इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली होती. स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करणेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29 ° C
29 °
29 °
69 %
3.9kmh
90 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page