कोल्हापूर :
उचगाव येथील शौर्या अश्विन शिंदेला बेस्ट कॅडेट अवॉर्डने नुकतेच गौरवण्यात आले. ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेणारी शौर्या कोल्हापूर ग्रुपच्या ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची एनसीसी कॅडेट आहे.
इयत्ता आठवी आणि नववीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना एनसीसीमधील २ वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत, बरेच कॅम्प करत, परेड कमांडर बनत, मानाची सार्जंट ही रँकसुद्धा मिळवली सोबतच “ए” सर्टिफिकेट परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन एनसीसीमधील सर्वात मोठा बहुमान म्हणजेच २०२५ चा बेस्ट कॅडेट अवॉर्ड पटकावला.
विशेष म्हणजे हा २०२५ चा बेस्ट कॅडेट स्कॉरलशीप अवॉर्ड, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांतील २०० शाळांच्या ज्युनियर विंगच्या जवळपास दहा हजार कॅडेट्समध्ये लेखी परीक्षा, स्पर्धा, स्किल टेस्ट आणि मुलाखत अशा आव्हानांचा मुकाबला करून सार्जंट शौर्याची निवड झाल्याने तिचे कौतुक होत आहे.
एनसीसी भवन कोल्हापूर येथे नुकताच पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कर्नल विक्रम नलवडे याच्या हस्ते सार्जंट शौर्या अश्विन शिंदे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कर्नल मानस दीक्षित, ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, सुभेदार मेजर नारायण पाटील, कॅप्टन श्रीदेवी पवार उपस्थित होते. सार्जंट शौर्याला ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, कॅप्टन वर्षा मस्के यांच्याकडून विशेष ट्रेनिंग मिळाले आहे. मुख्याध्यापिका चौधरी, उपमुख्याध्यापिका जमेनीस, सौ. साठे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सार्जंट शौर्या शिंदेला बेस्ट कॅडेट अवॉर्ड
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.5
°
C
28.5
°
28.5
°
79 %
12.3kmh
100 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

