कोल्हापूर :
येथील भुये व भुयेवाडीच्या भैरोबा माळावर दुर्मिळ होत चाललेल्या जुन्या वेलवर्गीय फळभाज्यांच्या बियांचे संवर्धन व लागवड उपक्रम उत्साहात पार पडला. भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीने रविवारी हा उपक्रम राबविला.
गेल्या दहा वर्षांपासून भुये व भुयेवाडीच्या भैरोबा माळावर कार्यरत असलेल्या भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीमार्फत पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी (दि.२७) सकाळी ९ ते १२ या वेळेत दुर्मिळ होत चाललेल्या जुन्या वेलवर्गीय फळभाज्यांच्या बियाण्यांची लागवड मोहीम राबविण्यात आली.
या विशेष उपक्रमात वरणा, भोपळा, दुधी भोपळा, कारले, दोडका, काकडी, कोहळा, पडवळ, वाल, ऊसावरच्या शेंगा, पापडी, श्रावण घेवडा आदी पारंपरिक व दुर्मिळ होत चाललेल्या भाज्यांच्या बियांची लागवड करण्यात आली. यासाठी सर्व भैरोबाभक्तांना या बियाण्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात वयोवृद्ध भैरोबाभक्तांनी या पारंपरिक बियाण्यांविषयी इत्यंभूत माहिती दिली. या माहितीनंतर सर्वांनी मिळून भैरोबा माळावरील तारेच्या कंपाऊंडच्या सभोवती बियांची लागवड केली. या उपक्रमाचा उद्देश या पारंपरिक जातींचे संवर्धन व पुढील पिढीपर्यंत या वाणांचे जतन करणे हा होता.
यावेळी भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीचे समन्वयक अमर पाटील, अमर मिसाळ, पैलवान सुभाष साळोखे, नामदेव पाटील, सचिन पाटील, साईनाथ शिंदे, शामराव खाडे, बाळासो चौगुले, विष्णू फडतारे. शशिकांत पाटील आणि बच्चेकंपनी यांसह अनेक भाविक उपस्थित होते.
जुन्या वेलवर्गीय फळभाज्यांच्या बियांचे संवर्धन व लागवड उपक्रम उत्साहात
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

