Homeकला - क्रीडापहिल्या दिवशी ९ संघ आणि ३४ खेळाडूंची नोंदणी

पहिल्या दिवशी ९ संघ आणि ३४ खेळाडूंची नोंदणी

कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) च्यावतीने सन २०२६-२७ फुटबॉल हंगामासाठी ‘ए’ डिव्हिजनमधील पात्र १६ संघांच्या नोंदणीला गुरुवारी सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या दिवशी ९ संघ आणि ३४ खेळाडूंनी नोंदणी केली.
पाटाकडील तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, रंकाळा तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ आणि वर्षाविश्वास तरुण मंडळ या ९ संघांनी नोंदणी केली आहे.
खंडोबा तालीम मंडळकडून १७ खेळाडूंची नोंदणी झाली. वेताळमाळ तालीम मंडळ १ तर वर्षाविश्वास तरुण मंडळचे १६ खेळाडू नोंदणी झाले आहेत. आज एकूण ३४ खेळाडूंची नोंदणी झाली.
केएसए कार्यालयात खेळाडू नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. यावेळी केएसएचे जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासणे, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, फुटबॉल रजिस्ट्रेशन प्रमुख संभाजीराव मांगोरे-पाटील तसेच कार्यकारणी सदस्य विश्वंभर मालेकर व दीपक घोडके आदी उपस्थित होते.
‘ए’ डिव्हिजनमधील पात्र प्रत्येक संघाने कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या १७ खेळाडूंची AIFF CRS प्रणालीवर Digilocker Verificationसह पूर्ण ‘Approved’ नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या १७ खेळाडूंची प्रमाणित यादी संघांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी केएसए कार्यालयात जमा केली आहे. त्यानुसार संघ व खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी होईल. नियमित नोंदणी ८ ते १० ऑक्टोबर, तर विलंब नोंदणी ११ ऑक्टोबरला होणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.9 ° C
28.9 °
28.9 °
68 %
2.2kmh
0 %
Thu
29 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Most Popular

You cannot copy content of this page